नव्या पोप यांची सामूहिक प्रार्थना   

व्हॅटिकन सिटी : नवे पोप रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट यांनी पदग्रहण केल्यानंतर पहिली सामूहिक प्रार्थना घेतली. इतिहासात प्रथमच उत्तर अमेरिकेचा पोप लिओ चौदावा त्यांच्या रूपाने पोप निवडला गेला आहे. रॉबर्ट प्रिवोस्ट (६९) हे मूळचे शिकागोचे आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ पेरूमध्ये मिशनरी म्हणून घालवला आणि २०२३ मध्येच ते कार्डिनल बनले. त्यांनी माध्यमांमध्ये खूप कमी मुलाखती दिल्या आहेत, सार्वजनिक ठिकाणी ते क्वचितच बोलतात. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर ते  लिओ २६७ वे कॅथलिक पोप बनले. पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते आणि त्यांनी १२ वर्षे कॅथलिक चर्चचे नेतृत्व केले.

Related Articles